भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीत 10 नवजात चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हदरला होता. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली होती. आता या समितीचा चौकशी अहवाल समोर आला आहे.
भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांना निलंबित, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिला बडे यांची अकार्यकारी पदावर बदली, वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना मेश्राम आणि परिसेविका ज्योती भारसकर यांच्यावर निलंबनाची तर कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे यांच्यावर सेवा समाप्तीची तसेच कंत्राटी बालरोग तज्ज्ञ डॉ.सुशिल अंबादे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
समितीच्या शिफारशीनंतर कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आता राज्य शासनाच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे 15 दिवसात हेल्थ ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती देखील टोपेंनी दिली.
Read Also :
- धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने मागे घेतली तक्रार
- या तारखेला होणार दहावी-बारावीची परीक्षा, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली
- वीज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी ‘या’ माजी आमदाराला तुरुंगवास
- ‘जिथे जाऊन येतात तिथे आगच लावतात’, सीरमच्या आगीवरून काँग्रेसचा मोदींवर निशाणा