यवतमाळ : यवतमाळ येथील आर्णी विधानसभा मतदार संघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांना महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी तोडसाम यांना 3 महिन्यांच्या कारावासाचा शिक्षा झाली असून त्यांची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली आहे.
2013 सालीचे हे प्रकरण असून, वीज देयकाबाबत समस्या असल्याने तोडसाम वीज वितरण कंपनीच्या पांढरकवडा उपविभागाच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांची तेथील लेखापालाशी वाद झाला होता.
या प्रकरणी लेखापालाच्या तक्रारीनंतर तोडसाम यांच्याविरोधात पोलिसांनी भादंवि 294, 352, 353, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने 2015 साली राजू तोडसाम यांना 3 महिन्याच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली होती. आता जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याने तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी झाली आहे.
Read Also :
- ‘जिथे जाऊन येतात तिथे आगच लावतात’, सीरमच्या आगीवरून काँग्रेसचा मोदींवर निशाणा
- ‘मित्रा, तुला विसरणं आणि दुःख पचवणं कठीण आहे’, धनंजय मुंडे झाले भावूक
- मृतांच्या कुटुंबियांसाठी पुनावालांचा मदतीचा हात, देणार ‘इतके’ लाख
- ‘मला जर संधी मिळाली तर…’ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेविषयी नाना पटोलेंची प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरे, शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार