मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना, आता मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे मिररने याबाबत वृत्त दिले आहे.
महिलेने 10 जानेवारीला धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने महिलेला तिचे स्टेटमेंट एफिडेव्हिटमध्ये द्यावे असे सांगितले होते, जेणेकरून नंतर ते बदलता येणार नाही.
मात्र आता महिलेने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेत असून, बलात्कारासंबंधी कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटले आहे. आता तक्रार मागे घेतल्याने, हे प्रकरण आपोआप बंद होणार आहे.
दरम्यान, मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात देखील अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. कृष्णा हेगडे, मनिष धुरी, जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनीही तिच्याविरुद्ध तक्रार केली आहे. या महिलेने आपल्याला ब्लॅकमेल केलं असा आरोप त्यांनी केला होता.
Read Also :
- या तारखेला होणार दहावी-बारावीची परीक्षा, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली
- वीज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी ‘या’ माजी आमदाराला तुरुंगवास
- ‘जिथे जाऊन येतात तिथे आगच लावतात’, सीरमच्या आगीवरून काँग्रेसचा मोदींवर निशाणा
- ‘मित्रा, तुला विसरणं आणि दुःख पचवणं कठीण आहे’, धनंजय मुंडे झाले भावूक