रांची : राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अधिक खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्याच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर आधीपासूनच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आता त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आहे.
फुफ्फुसांमध्ये इंफेक्शन झाल्याने त्यांना श्वास घेण्यास समस्या येत असल्याचे सांगितले जात आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील हॉस्पिटलला भेट देत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली.
त्यांच्यात निमोनियाची लक्षणे दिसत आहेत. कोरोनाची तपासणी करण्यासाठी त्यांचे नमुने घेण्यात आले असून, लालूंची रॅपिड अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही.
लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्या प्रकरणी 2017 पासून तुरुंगात आहेत. या कालावधीतच मागील दोन वर्षांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Read Also :
- वीज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी ‘या’ माजी आमदाराला तुरुंगवास
- ‘जिथे जाऊन येतात तिथे आगच लावतात’, सीरमच्या आगीवरून काँग्रेसचा मोदींवर निशाणा
- ‘मित्रा, तुला विसरणं आणि दुःख पचवणं कठीण आहे’, धनंजय मुंडे झाले भावूक
- मृतांच्या कुटुंबियांसाठी पुनावालांचा मदतीचा हात, देणार ‘इतके’ लाख
- ‘मला जर संधी मिळाली तर…’ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेविषयी नाना पटोलेंची प्रतिक्रिया