नवी दिल्ली : कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, चीन-नेपाळ वाद व आता सुरू असलेल्या कृषी कायदा अशा अनेक गोष्टींवरून विरोध केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करत आहे. कोरोना व्हायरस व लॉकडाऊनमधील निर्बंधांचा सर्वसामन्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसला. असे असले तरी मोदी सरकारची लोकप्रियता कमी झाली नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर भाजप पुन्हा बहुमताने सत्ते येईल व काँग्रेसची पुन्हा एकदा पीछेहाट होईल, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. इंडिया टुडे-कार्वी इनसाइट्सच्या मूड ऑफ द नेशन या सर्वेक्षणातून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारची लोकप्रियता अद्याप कायम असल्याचे समोर आले आहे.
आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सहज बहुमत मिळवेल. MOTN सर्वेनुसार, एनडीएला 321 जागांवर विजय मिळू शकतो. तर एकट्या भाजपलाच 291 जागा मिळतील. तर दुसरीकडे काँग्रेस प्रणित यूपीएला 93 आणि इतरांना 129 जागांवर समाधान मानावे लागेल.
एकूण 19 राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी 97 लोकसभा मतदारसंघ आणि 194 विधानसभा मतदारसंघांमध्ये जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. 3 ते 13 जानेवारीदरम्यान 12,232 लोकांचा सर्वेक्षण केले गेले. यात एकूण 60 टक्के जनता मोदींच्या कारभारावर समाधानी असल्याचे समोर आले आहे.
Read Also :
- अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी काँग्रेस राज्यभर करणार आंदोलन
- भंडारा दुर्घटनेचा चौकशी अहवाल सादर, आरोग्य विभागाची मोठी कारवाई
- धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने मागे घेतली तक्रार
- या तारखेला होणार दहावी-बारावीची परीक्षा, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली