नाशिक : अमेरिकेत डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बाइडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची नुकतीच शपथ घेतली. तर निवडणुकीतील पराभवामुळे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पद सोडावे लागले. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी माझं ऐकलं असतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, अशी शाब्दिक टोलेबाजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
अमेरिकेच्या राजकारणावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, नाल्ड ट्रम्प यांनी दादागिरी, गुंडगिरी केली हा लोकशाहीला कलंक आहे. अमेरिकेत माझा रिपब्लिकन पक्ष हरल्याचं दुःख आहे. ट्रम्प यांनी माझं ऐकलं असतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.
आठवलेंनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बाइडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे देखील अभिनंदन केले. ते नाशिकमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दिल्लीतील आंदोलन प्रसिद्धीसाठी सुरू आहे. शेतकरी आंदोलन असते तर न्यायालयाने सांगितल्याने आंदोलन थांबायला हवे होते. हे निरर्थक आंदोलन आहे. सरकारची अडचण लक्षात घेऊन आंदोलन मागे घ्यावे.
Read Also :
- शेतकरी आंदोलन : फडणवीसांनी घेतली अण्णा हजारेंची भेट, मात्र…
- मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार महिलेने मागे घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले…
- रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, चित्रा वाघ यांची मागणी
- मी पुन्हा येईन… आज लोकसभा निवडणुका झाल्या तर अशी असेल स्थिती
- अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी काँग्रेस राज्यभर करणार आंदोलन