मुंबई : देशात सध्या कोरोना व्हायरस महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडला हे. या संकटाच्या काळात प्रत्येकजण जसे जमेल तसे मदत करत आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांन युट्यूबद्वारे होणारी कमाई कोविडसंदर्भातील कामांसाठी देणगी देत असल्याचे खुलासा केला आहे.
नितीन गडकरी यांनी देशातील विद्यापीठांमधील कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या युट्यूब कमाई आणि कोविडसंदर्भातील कामांसाठी देणगीबाबत सांगितले.
आधी मी फारसा सोशल मीडियावर नव्हतो. कोरोना कालावधीमध्ये मी याचा जास्त वापर करू लागलो. कोरोना संकटापूर्वी फार सोशल नेटवर्किंग फ्रेण्डली नव्हतो. मी त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर फार सक्रीय नव्हतो. पंतप्रधान मोदी आम्हाला यासंदर्भातील माहिती देत यावर सक्रीय राहण्याचा आग्रह करायचे. मात्र मला ते जमत नव्हते. मात्र, कोरोना संकटामुळे सोशल मीडियावर सक्रीय व्हायला लागलो, असे नितीन गडकरी म्हणाले.
युट्यूबवरून जी भाषणे दिली, त्यासाठी आता युट्यूबकडून पैसे दिले जातात. आजच्या घडीला मला युट्यूबकडून महिन्याला चार लाख रुपये दिले जातात. हे पैसे कोव्हिडसंदर्भातील कामांसाठी देणगी म्हणून मी दिले आहेत, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
Read Also :
- ‘बार्जमधील निष्पापांच्या मृत्यूला ONGC प्रशासन जबाबदार’
- ‘मोदी गुजरात तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा’
- ‘गतवर्षी आलेल्या निसर्ग वादळाची आधी “तातडीने” भरपाई द्या’
- ‘शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या अन्यथा…’, काँग्रेसचा मोदी सरकारला इशारा
- ‘ठाकरे सरकार पाण्यात डुंबत बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही’