मुंबई : पुण्यातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक काही महिन्यापासून गंभीर आजारी आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत देखील त्यांनी अशा अवस्थेत देखील त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना भाजपने न येण्याची विनंती केली, मात्र तरी देखील त्यांनी विधानभवनात येऊन मतदानाचा हक्क बजावला.
“मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा”; भाजपच्या नेत्याचं सुचक वक्तव्य
लक्ष्मण जगताप यांनी फोन केला असता त्यांना विधिमंडळात मतदान करण्यासाठी न येण्याची विनंती केली. त्यांनतर त्यांनी चंद्रकांत पाटलांना फोन केला असता काहीही झालं तरी मतदानाला येणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांची जी पक्षावर निष्ठा आहे. त्या निष्ठेला आम्ही सलाम करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लक्ष्मण जगताप एक सामान्य माणासांचा कार्यकर्ता आहे. त्यांनी एकदा मनात घेतलं की ते करतातच. त्यांना वाटत होतं की पक्षाला त्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे ते मतदान करण्यासाठी विधिमंडळात आले आम्ही नाही म्हटलो तरी ते आले असते. त्यामुळे पक्षाला यापेक्षा मोठे नेते कोण असू शकतात असंही फडणवीस म्हणाले.
“मी पुन्हा येईन”, रोहित पवारांनी काढली फडणवीसांची जुनी आठवण
राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः भाजपाचे हे ब्रीद देशभरातील असंख्य कार्यकर्ते जगत आहेत. आज आमच्या सहकारी मुक्ताताई टिळक यांनी विधान भवन मुंबई येथे आपला मतदानाचा हक्क बजावून याचाच परिचय दिला. पक्ष समर्पण ही सर्वोच्च भावना त्यांनी वागणुकीतून सिद्ध केली. त्यांचे अनेक आभार असं म्हणत त्यांनी मुक्ता टिळक यांचे देखील आभार मानले.
“गद्दारी करून सत्तेत आलेल्या सरकारला आमदार योग्य उत्तर देणार”
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत देखील या दोन्ही नेत्यांना रूग्णवाहिकेतून विधानभवनात आणण्यात आलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: विधानभवनाच्या पायऱ्यावर येऊन त्यांचं स्वागत केले. याही वेळेस त्यांना घेण्यासाठी पायऱ्यांवर आले होते.
Read also:
- “पुढचा मुख्यमंत्री प्रहारचाच, हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा”; बच्चू कडू
- “भाजपचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला”; खडसेही उपस्थित, राजकीय वर्तुळात चर्चा
- “सेनेला मतदान देण्यासाठी माझ्यावर मुख्यमंत्र्यांकडून दबाव”; रवी राणांचा गंभीर आरोप
- “पंकजा मुंडे अन् नाथाभाऊंची झालेली गळचेपी याचा फटका भाजपला बसणार”
- “उमेदवार निवडून आल्यास संजय राऊत काय बोलणार ते आता मी पाहणार”; देवेंद्र भुयार