मुंबई : वानखेडे स्टेडियम येथे न्यूझीलंड आणि भारतीय क्रिकेट संघ यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. हा सामना पाहण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हजेरी लावली होती. चाकणकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
रुपाली चाकणकर आणि अमृता फडणवीस बसल्या शेजारी शेजारी…!
चाकणकर यांनी पोस्ट मध्ये लिहिले की , आदरणीय शरद पवार साहेबांसोबत वानखेडे स्टेडियम येथे जाण्याचा योग आला. आयुष्यातील स्वप्नांपैकी एक सोनेरी स्वप्न आज पूर्ण झाले. शरद पवार साहेबांनी क्रीडा क्षेत्रात केलेलं कार्य उत्तुंग आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय, आयसीसी या संघटनांच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर नेण्याचं काम शरद पवार यांनी केल्याचे चाकणकर पोस्टमध्ये म्हणाल्या.
शरद पवार साहेबांच्या उपस्थित या मैदानावर झालेले क्रिकेटचे सामने लहानपणापासून फक्त टीव्हीवर पाहत आले. अनेक देशांचे संघ भारतात खेळण्यासाठी उत्सुक असतात. आज प्रत्यक्ष या माझ्या दैवतासोबत उपस्थित राहून पाहण्याचा योग आला, अशा शब्दात चाकणकरांनी शरद पवारांचे आभार देखील मानले. दरम्यान शरद पवार यांनी बीसीसीआय तसेच आयसीसीच्या अध्यक्षपदाची देखील धुरा सांभाळली होती
Read Also :
- बच्चू कडू वादात; बोगस कागदपत्र आणि भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार दाखल
- अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती
- सहावीला पिंपरी चिंचवडला आलो; ‘त्या’ पोस्टरने शहरात पुन्हा उडाली खळबळ
- …तर तिसरी लाट ओमायक्रॉनची असेल; आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी नारायण राणेंच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी ठोकला शड्डू