पुणे – सत्तेत असलेली महाविकासआघडी आणि विरोधी पक्ष भाजप हे सतत एकमेकांवर कुरघोडी करत असतात. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात सतत शाब्दिक चकमकी चालूच असतात. मात्र आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि अमृता फडणवीस एकाच सिटवर बसलेल्या पाहायला मिळाल्या.
आज पुण्यात लोकशाही न्यूज तर्फे आयोजित केलेल्या लोकशाही पुणे रत्न सन्मान सोहळा रंगला. यावेळी रुपाली चाकणकर आणि अमृता फडणवीस एकमेकांशेजारी सोफ्यावर बसल्या होत्या. सतत एकमेकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या या दोन महिला एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक राजकीय नेते मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
मावळ तालुक्यात झालेले ‘ते’ दोन पक्षप्रवेश पडणार कोणाच्या पथ्यावर?
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार रोहित पवार ही दिग्गज मंडळी देखील उपस्थित होती. हा सोहळा पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जवळील आर्किड हॉटेल येथे पार पडला.
Read Also :
- मिशन- २०२२ : अजित गव्हाणेंच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीत बंडखोरीचे ‘बारसे’? खासदार कोल्हेंच्या उपस्थितीतील कार्यक्रम
- मुंबै बँक बिनविरोध; प्रवीण दरेकर, प्रसाद लाडांना विरोधकच नाही
- ‘पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात’; सदाभाऊ खोतांचा टोला
- आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; संतप्त आंदोलकांनी मृतदेह आणला थेट बसस्थानकातच!
- किल्ले रायगडावरील होळीच्या माळावरच राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरेल; संभाजीराजे यांची माहिती