पुणे : पार्थ पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. पार्थ पवार यांनी अजित पवार यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. पार्थ पवार यांनी अजित पवार यांच्या कोणत्या विषयावर चर्चा झाली यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही.
तिसरी लाट आली, ठाकरे सरकार लवकर जागे व्हा; नागपूर खंडपीठाने सरकारला फटकारलं
पुण्यातील शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाल्याचं कळतंय. पार्थ पवार हे जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना भेटल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिचवडमध्ये सक्रीय झालेले आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा झाल्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. तसेच, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची लगबग सुरू आहे. त्यामुळे, यावरही चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.
आमदार श्वेता महालेंनी खोचले पदर; बँकेच्या व्यवस्थापकास झाप-झाप झापले, काय घडलं नेमकं…
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदी जुन्या आणि उपाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची राष्ट्रवादीची रणनीती ठरल्याची माहिती आहे. दुपारी एक वाजता निवडणूक होणार असून त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व संचालकांची बैठक घेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी आमदार रमेश थोरात यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे अजित पवार कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या 21 पैकी 16 जागा जिंकत राष्ट्रवादीचे बॅंकेवर एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. या 16 जणांना एका अपक्षाची साथ मिळाली आहे. त्यामुळे पार्थ पवारांच्या भेटीमागे नेमकं काय कारण आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Read also:
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे “पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया उसके जैसा “; फडणवीसांनी पवारांना पुन्हा डिवचले
- आता एसटीमध्ये खासगी, सेवानिवृत्त चालक घेतले जाणार; व्यवस्थापकीय संचालकांची मोठी घोषणा
- धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील, ‘पम्मी तुम जिती मै हारा’; करूणा मुंडेचा दावा
- तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा – चंद्रकांत पाटील
- चित्रा ताई… “तेरे वार पर पलटवार हु मै”; राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांचा निशाणा