बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील पिकविम्याची आलेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली जात अनेक तक्रारी शेतकरी करत होते. शेतकऱ्याची रक्कम परस्पर शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वळती केली जात होती. भाजपच्या आमदार श्वेता महाले शेतकऱ्यांना सोबती घेवून थेट बँकच गाठली.
अजित पवारांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर; पुण्यातील बड्या बिल्डरकडे २० लांखाच्या खंडणीची मागणी
चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकाला आमदार श्वेता महाले यांनी चांगलेच धारेवर धरत एकेरी भाषेत झापले. यावेळी मॅनेजरला माफीसुद्धा मागायला लावली. यावेळी महाले यांनी मॅनेजरला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड काढण्यास भाग पाडले. यावेळी आमदार महाले यांनी मॅनेजरला मारण्याची भाषा ही केली असल्याचे दिसून आले. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्राने काय मांडले मुद्दे? राजेश टोपेंनी दिली सविस्तर माहिती
बँकेच्या व्यवस्थापका विरुध्द अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या मनमानीसह उद्धट वागणुकीबद्दल तक्रारी केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पीक विम्याचे आलेले पैसे न देता त्यांचे पैसे शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे परस्पर कर्ज खात्यात जमा केल्या जात होते. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरत चालला होता. या बँक व्यवस्थापकास अनेकदा फोन करून समज दिली तरीही आमदार श्वेता महाले यांचे त्यांनी ऐकले नाही, तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या.
दुकानांवरील मराठी पाट्यांच श्रेय कुणाचं? राज ठाकरेंच्या दाव्यावर संजय राऊत म्हणतात…
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांना सांगूनही सदर बँक व्यवस्थापकाचा कारभार सुधारला नव्हता. त्यामुळं आमदार श्वेता महाले यांनी काल बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकास घेराव घालून जाब विचारलाय. यावेळी त्याला आमदारांनी चांगलेच झापले. यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होतो. तर आमदारांच्या या अवतारानंतर बँकेने लावलेला होल्ड काढला. आणि आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली, अशी माहिती आमदार श्वेता महाले यांनी दिली.
Read also:
- तिसरी लाट आली, ठाकरे सरकार लवकर जागे व्हा; नागपूर खंडपीठाने सरकारला फटकारलं
- राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे; चंद्रकांत पाटीलांची खळबळजनक टीका
- शहापूरात शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी अघोरी प्रकार; धक्कादायक फोटोस झाले व्हायरलं
- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात; 1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार
- गोड बोलण्यासाठी तिळगुळाची गरज नाही, आमचा कारभार उघड आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे