मुंबई : मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक काल (13 जानेवारी) पार पडली. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भाजपला एक जोरदार धक्का दिला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणले की, मुंबई बँकेत मुंबई बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे मात्र शिवसेनेला उपाध्यक्षपद मिळाले. राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे अशी खळबळजनक टीका पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.
पाट्या बदलण्याचा खर्च जास्त की काचा बदलण्याचा? संदीप देशपांडेंचा अमराठी व्यवसायिकांना इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अन्य कुणाकडे सोपवण्याची ही वेळ आहे. संजय राऊत यांनी माझ्या आणि पक्षाच्या तब्येतीची काळजी करू नये असा सल्ला देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबै बँकेच्या अध्यक्षपद मिळवण्यात यश मिळवलं पण शिवसेनेचा उमेदवार उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडला… कसं झालं हे? आता हे शिवसेनेला कळत नाहीये की, तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे आणि त्या प्लॅनमध्ये तुम्ही फसत चालला आहे.
अजित पवारांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर; पुण्यातील बड्या बिल्डरकडे २० लांखाच्या खंडणीची मागणी
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे 11 संचालक सदस्य संख्या झाली. तर, भाजपकडे 9 संचालक संख्या होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पारड्यात जास्त मतं आली. पण, उपाध्यपदाच्या निवडणुकीत समसमान मतं मिळाल्यामुळे गोंधळ झाला. त्यामुळे महाविकास आघाडीला उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
Read also:
- शहापूरात शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी अघोरी प्रकार; धक्कादायक फोटोस झाले व्हायरलं
- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात; 1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार
- गोड बोलण्यासाठी तिळगुळाची गरज नाही, आमचा कारभार उघड आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- दुकानांवरील मराठी पाट्यांच श्रेय कुणाचं? राज ठाकरेंच्या दाव्यावर संजय राऊत म्हणतात…
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्राने काय मांडले मुद्दे? राजेश टोपेंनी दिली सविस्तर माहिती