शहापूर : शहापूर नगरपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली तर अवघ्या ४ जागांसाठी येत्या आठवड्यात निवडणूक होणार आहे. मात्र, या निवडणुकीचा निकाल एकत्रित लागणार असून उर्वरित निवडणूक होण्या अगोदर व निकाल जाहीर होण्याअगोदर अज्ञात व्यक्तींकडून अघोरीं कृत्य केले जात असल्याचे शहापूरच्या पठाणवाडा येथील पिपंळाच्या झाडाखाली आढळून आहे.
लवकरच राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दिसतील; माजी आमदार विजय गव्हाणेंचा गौफ्यस्पोट
संबंधित कृतीचे व्हिडीओज आणि फोटो आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारांना हरवा, असा मजकूर लिहिलेला फोटो व्हायरल होत आहेत. जादूटोण्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियात खळबळ उडाली असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
मराठी पाट्या लावायला सांगणारे सरकार मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? इम्तियाज जलीलांचा चिमटा
खरंतर, सध्या ओबीसी जागांवर निवडणूक घेण्यास स्थगिती देण्यात आली आहे. अशात शहापूर नगरपंचायतसह अन्य चार ठिकाणी निवडणुका पार पडत आहेत. येत्या 18 जानेवारीला संबंधित चार ठिकाणी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. मात्र खरी लढत ही भाजप आणि शिवसेनेत होत आहे.
पाट्या बदलण्याचा खर्च जास्त की काचा बदलण्याचा? संदीप देशपांडेंचा अमराठी व्यवसायिकांना इशारा
अशात निवडणुकीला रंग चढत असताना शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारांच्या फोटोंचा आणि कागदाचा वापर करत अघोरी प्रकार केल्याचा व्हिडीओ आणि फोटोज शहापूर तालुक्यात चांगलेच व्हायरल होत आहे. निवडणूक आणि निकाल जाहीर होण्याआधी अज्ञात व्यक्तींकडून हे अघोरी कृत्य केलं गेलं आहे. शहापूर तालुक्यातील पठाणवाडा येथील एका पिपंळाच्या झाडाखाली हे जादूटोणा केलेल्या संशयित कागदं आढळून आले आहेत.
Read also:
- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात; 1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार
- गोड बोलण्यासाठी तिळगुळाची गरज नाही, आमचा कारभार उघड आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- दुकानांवरील मराठी पाट्यांच श्रेय कुणाचं? राज ठाकरेंच्या दाव्यावर संजय राऊत म्हणतात…
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्राने काय मांडले मुद्दे? राजेश टोपेंनी दिली सविस्तर माहिती
- अजित पवारांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर; पुण्यातील बड्या बिल्डरकडे २० लांखाच्या खंडणीची मागणी