नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. दोन टप्प्यात हे अधिवेशन होणार असल्याची माहिती असून 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. CCPA ने 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा घेण्याची शिफारस केली आहे. तर 14 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान भाग टप्पा घ्यावा अशी शिफारस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लवकरच राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दिसतील; माजी आमदार विजय गव्हाणेंचा गौफ्यस्पोट
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्वाचे असणार आहे. या अधिवेशनात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या पाच राज्यांसह अन्य राज्यांना काय मिळणार? याकडे लक्ष लागून आहे.
मराठी पाट्या लावायला सांगणारे सरकार मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? इम्तियाज जलीलांचा चिमटा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानं हे अधिवेशन दोन टप्प्यात होत असल्याची माहिती आहे. देशात कोरोनाचे रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत काळजी घेत हे अधिवेशन घ्यावे लागणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर वाढत्या कोरोनाचे सावट आहे. त्या पाश्वर्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.
Read also:
- गोड बोलण्यासाठी तिळगुळाची गरज नाही, आमचा कारभार उघड आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- दुकानांवरील मराठी पाट्यांच श्रेय कुणाचं? राज ठाकरेंच्या दाव्यावर संजय राऊत म्हणतात…
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्राने काय मांडले मुद्दे? राजेश टोपेंनी दिली सविस्तर माहिती
- अजित पवारांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर; पुण्यातील बड्या बिल्डरकडे २० लांखाच्या खंडणीची मागणी
- पाट्या बदलण्याचा खर्च जास्त की काचा बदलण्याचा? संदीप देशपांडेंचा अमराठी व्यवसायिकांना इशारा