मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नव्हते. मात्र, त्यांच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे. या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि महाराष्ट्र राज्याच्यावतीने काय मुद्दे मांडले याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर पाट्या मराठीतच कराव्या लागतील; राऊतांचा सज्जड दम
राजेश टोपे यांनी म्हटलंय की, सध्या कोव्हॅक्सिनचे डोस कमी पडत आहेत तर या लशींचे डोस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. तुडवडा असलेल्या कोव्हॅक्सिनची आम्ही मागणी केली आहे. लशीव्यतिरिक्त दुसरा मुद्दा मांडला चाचण्यांच्या अनुषंगाने… बरेच लोक होम किट्सचा वापर करत आहेत. RAT च्या माध्यमातून जे लोक पॉझिटीव्ह आढळून येत आहेत, त्यांची माहिती राज्याला समजण्याची अद्याप यंत्रणा नाहीये. तर अशांची माहिती ठेवण्यासाठीची यंत्रणा आपण करत आहोत.
मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा नेता; भाजप नेते प्रविण दरेकरांच वर्चस्व संपुष्टात?
पुढे ते म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे व्हेरियंट्स आहेत. आपल्या राज्यातील चार हजार नमुन्यांपैकी 1300 ओमिक्रॉनचे तर 2700 केसेसे डेल्टाचे आहेत. म्हणजे ओमिक्रॉनपेक्षा डेल्टा हा 70 टक्क्यांनी कार्यान्वित असून प्रभावी आहे. उपचाराबाबत बोलायचं झाल्यास काही जण ट्रिटमेंट प्रोटोकॉलच्या बाबतीत सुस्पष्टता असायला हवी. ती तुम्ही द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. ते म्हणाले की, मोदींनी स्पष्ट सांगितलं की, आर्थिक नुकसान न होता खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी कराव्यात. या अनुषंगाने निर्बंधाबबातचा निर्णय येणाऱ्या काळात घ्यावे लागणार आहेत.
Read also:
- अजित पवारांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर; पुण्यातील बड्या बिल्डरकडे २० लांखाच्या खंडणीची मागणी
- पाट्या बदलण्याचा खर्च जास्त की काचा बदलण्याचा? संदीप देशपांडेंचा अमराठी व्यवसायिकांना इशारा
- मराठी पाट्या लावायला सांगणारे सरकार मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? इम्तियाज जलीलांचा चिमटा
- लवकरच राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दिसतील; माजी आमदार विजय गव्हाणेंचा गौफ्यस्पोट
- गेली १८ दिवसांपासून गायब असलेले भाजप आमदार नितेश राणे अखेर माध्यमांसमोर प्रकटले