मुंबई : मुंबई जिल्हा बँकेवरचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे वर्चस्व आता संपुष्टात आलं आहे का? असा प्रश्न निर्माण झाल आहे. कारण मुंबै जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. मुंबै जिल्हा बँक अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे विजयी झाले आहेत. कांबळेंच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडल्याने प्रविण दरेकरांना मोठा धक्क बसला आहे.
कोरोनामुक्त होताच रोहित पवारांनी मतदारसंघ गाठला; कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणनिती?
अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रसाद लाड पराभूत झाले आहेत. ११ विरूद्ध ९ मतांनी विजयी झाले आहेत. उपाध्यक्ष पदामध्ये टाय झालं होतं. यानंतर ईश्वर चिठ्ठीने याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उपाध्यक्ष पद विठ्ठल भोसले यांच्याकडे गेलं आहे. थोडक्यात अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि उपाध्यक्षपद भाजपकडे गेलं आहे. एक वर्षांनंतर मुंबै बँक अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार? संजय राऊतांची मोठी घोषणा
मुंबै बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबै बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परीवर्तण करण्याची रणनीती आखल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आता मुंबै बँकेवर अध्यक्ष पदी सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
Read also:
- महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर पाट्या मराठीतच कराव्या लागतील; राऊतांचा सज्जड दम
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी; राणेंच्या उमेदवारानेच मारली बाजी
- भाजप नेते नितेश राणे यांना न्यायालयाचे अभय? आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं…
- मराठी पाट्यांचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गर्भित इशारा
- बांगड्या विकू, मात्र आंदोलन सुरुच राहील; एसटी कर्मचाऱ्यांनी शोधला जगण्याचा नवा पर्याय