मुंबई : शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या शब्दांच्या बाणांनी ते घायाळ करत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी एक असंच बेधडक वक्तव्य केलं आहे. नुकताच राज्य मंत्रिमंडळात एक महत्वपूर्ण ठराव मंजूर करून घेण्यात आला आहे.मुंबईसह राज्यातील इतर शहरांमधील दुकानांच्या पाट्या आता इथून पुढं मराठीत आणि मोठ्या मोठ्या अक्षरात असायला हव्या असा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे.
मंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानियांचे न्यायालयात आवाहन… काय नेमकं प्रकरणं…
या निर्णयाच्या विरोधात काही अमराठी व्यवसायिकांनी निषेध नोंदवला आहे. या संदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता राऊतांनी संताप व्यक्त करत अमराठी व्यवसायिकांना सज्जड दम भरला आहे. विरोध करत असतील तर त्यांनी बिनधास्त विरोध करावा. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक राज्याला मातृभाषेचा अधिकार आहे. त्यामुळे विरोध कसला करताय? तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रा त राहायचंय हे विसरू नका. तुम्हाला इथेच राहूनच व्यापार करायचा आहे. उद्योगधंदा करायचा आहे.
कोरोनामुक्त होताच रोहित पवारांनी मतदारसंघ गाठला; कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणनिती?
त्यामुळे कोणत्याही व्यावसायिकांनी म्हणू नये की आम्ही याबद्दल विरोध करतोय. तुम्हाला जर महाराष्ट्रात धंदा करायचा असेल तर तुम्हाला या निर्णयाची अंबलबजावणी करावीच लागेल. हे काही राजकीय भांडण नाही. हा आमच्या मराठी अस्मितेचा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला पाट्या मराठीतच कराव्या लागणार आहेत असा सज्जड दम संजय राऊत यांनी भरला आहे.
Read also:
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी; राणेंच्या उमेदवारानेच मारली बाजी
- भाजप नेते नितेश राणे यांना न्यायालयाचे अभय? आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं…
- मराठी पाट्यांचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गर्भित इशारा
- बांगड्या विकू, मात्र आंदोलन सुरुच राहील; एसटी कर्मचाऱ्यांनी शोधला जगण्याचा नवा पर्याय
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार? संजय राऊतांची मोठी घोषणा