मुंबई : शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी अडचणीत आल्याने जवळपास अठरा दिवसांपासून अज्ञातवासात असलेले भाजपचे आमदार नितेश राणे गुरूवारी अचानक प्रकटले. राणे यांनी थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँक गाठत नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसोबत विजयाचे सेलिब्रेशन केलं. दरम्यान, राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर सोमवारी (ता. 17) मुंबई उच्च न्यायालयाकडून निकाल दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार? संजय राऊतांची मोठी घोषणा
सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत. त्यातच सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल सोमवारी लागणार आहे. पण या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने त्यांना अटक न करण्याची हमी दिली आहे. पण त्यानंतरही राणे जवळपास 18 दिवसांपासून समोर आले नव्हते.
बांगड्या विकू, मात्र आंदोलन सुरुच राहील; एसटी कर्मचाऱ्यांनी शोधला जगण्याचा नवा पर्याय
काही दिवसांपूर्वीच भाजपने बँकेत दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धूर चारली. पण त्यानंतरही नितेश राणे विजयाच्या जल्लोष उघडपणे सहभागी झाले नव्हते. त्यांनी त्यावर ट्विटही केलेलं नाही. त्यामुळे जामीन अर्जावर निकाल लागल्यानंतरच ते समोर येतील, अशी चर्चा होती. पण अखेर गुरूवारी अध्यक्ष व उपाध्यक्षांची नावे घोषित झाल्यानंतर नितेश यांनी थेट बँकेतच हजेरी लावत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. आता अटकपूर्व जामीनावर निर्णय होईपर्यंत ते कार्यकर्त्यांमध्ये सक्रीय राहणार की पुन्हा नॉट रिचेबल होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.
Read also:
- मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा नेता; भाजप नेते प्रविण दरेकरांच वर्चस्व संपुष्टात?
- महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर पाट्या मराठीतच कराव्या लागतील; राऊतांचा सज्जड दम
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी; राणेंच्या उमेदवारानेच मारली बाजी
- भाजप नेते नितेश राणे यांना न्यायालयाचे अभय? आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं…
- मराठी पाट्यांचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गर्भित इशारा