मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात राजकीय घडामोडींना ऊत आला आहे. महाराष्ट्रातच नाही तर गोवा, उत्तरप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्के देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक मोठी मोहीमच जणू काही सुरु केली आहे, असं दिसतं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार? संजय राऊतांची मोठी घोषणा
उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपच्या तीन मंत्र्यांनी आणि १२ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. दुसरीकडे गोव्यात संजय राऊत तळ ठोकून बसले आहेत. एका मागोमाग एक धक्का असं धक्कातंत्र महाविकास आघाडीकडून सुरु आहे. काल परभणीतील भाजपचे माजी आमदार आणि विदर्भातील मनसेच्या नेत्याने आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
बांगड्या विकू, मात्र आंदोलन सुरुच राहील; एसटी कर्मचाऱ्यांनी शोधला जगण्याचा नवा पर्याय
त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर खळबळ उडवून दिली आहे. मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात विजय गव्हाणे यांनी शरद पवार, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आता पूर्वीसारखा भाजप राहिला नाही अशी खंत देखील त्यांनी प्रवेशावेळी बोलून दाखवली आहे. यानंतर भाजप आता आपल्या विचारसरणीत कसा बदल करत आहे हे देखील विजय गव्हाणे यांनी बोलून दाखवलं आहे. राज्यातील भाजप देवेंद्र फडणवीस चालवतात असं लोकांना भासवत जरी असलं तरी पडद्यामागे मात्र वेगळंच काही तरी सुरु आहे. खरा पक्ष तर नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर हे चालवतात.
मराठी पाट्यांचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गर्भित इशारा
काही दिवसांपूर्वी अमित शहा हे शिर्डीमध्ये जाऊन आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून लवकरच राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती होणार असा गौफ्यस्पोट देखील गव्हाणे यांनी केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या वेळचा भाजप पक्ष आज राहिलेला नाही. अनेक बहुजन नेत्यांना पदावरून दूर केलेले आहे, अशी खंत विजय गव्हाणे यांनी व्यक्त केली आहे.
Read also:
- गेली १८ दिवसांपासून गायब असलेले भाजप आमदार नितेश राणे अखेर माध्यमांसमोर प्रकटले
- मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा नेता; भाजप नेते प्रविण दरेकरांच वर्चस्व संपुष्टात?
- महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर पाट्या मराठीतच कराव्या लागतील; राऊतांचा सज्जड दम
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी; राणेंच्या उमेदवारानेच मारली बाजी
- भाजप नेते नितेश राणे यांना न्यायालयाचे अभय? आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं…