मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. आतापर्यंत परिवहनमंत्री अनिल परब यांनी आणि सरकारने प्रयत्न करूनही हा संप फोडण्यात सरकारला यश आले नाही. कर्मचाऱ्यांची पगारवाढ झालेली असतानाही एसटी कर्मचारी संप सोडून परतलेले नाहीत.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात; 1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार
संपकरी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या तीन मोठ्या संघटनांनी संप मागे घेण्याची घोषणा केलेली आहे. असं असतानाही एसटी कर्मचारी थेट ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली आता संपावर आहेत. दुसऱ्या बाजूला एसटी संपाचे वकीलपत्र ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत.
शहापूरात शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी अघोरी प्रकार; धक्कादायक फोटोस झाले व्हायरलं
संपामुळे आतापर्यंत एसटीचे तब्ब्ल १२०० कोटींचे नुकसान झाले आहे. पण आता एसटीने नुकसान कमी करण्यासाठी खासगी व सेवानिवृत्त चालकांवर भरवसा दाखवत संपावरील कर्मचाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्ट संकेत एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. याबाबत त्यांनी माहिती दिली की राज्यातील २५० डेपोपैकी २१५ डेपो सुरू झाले आहेत. सुमारे २६ हजार ५०० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सुमारे ९२ हजार कर्मचाऱ्यांपैकी ३ हजार १२३ कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे; चंद्रकांत पाटीलांची खळबळजनक टीका
राज्यात शुक्रवारी दिवसभरात लालपरीच्या ७ हजार फेऱ्या झाल्या असून ३ लाख ८८ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती चन्ने यांनी दिली आहे. जनतेला सेवा देणं आवश्यक आहे , त्यामुळे राज्य सरकारकडून खासगी चालकांना कामावर घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत ४०० खासगी चालक घेतले आहेत. त्यांना केवळ एक महिन्यांसाठी घेण्यात आलं आहे. गरज पडल्यास त्यांना आणखी वाढवले जाईल.पण खासगी कंत्राटी चालक घेऊन कर्मचाऱ्यांना सोडण्याचा विचार नाही, असं देखील चन्ने यांनी स्पष्ट केलं.
Read also:
- धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील, ‘पम्मी तुम जिती मै हारा’; करूणा मुंडेचा दावा
- तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा – चंद्रकांत पाटील
- चित्रा ताई… “तेरे वार पर पलटवार हु मै”; राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांचा निशाणा
- आमदार श्वेता महालेंनी खोचले पदर; बँकेच्या व्यवस्थापकास झाप-झाप झापले, काय घडलं नेमकं…
- तिसरी लाट आली, ठाकरे सरकार लवकर जागे व्हा; नागपूर खंडपीठाने सरकारला फटकारलं