पुणे : मुंबै बँकेच्या निवडणूकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलचा विजय झाला. सर्वच २१ जागा जिंकल्या. परंतू, अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची वर्णी लागली. त्यामुळे, दरेकरांचे वर्चस्व संपुष्टात आल्याचे चर्चा रंगली आहे. यावरूनच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे.
पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्राने काय मांडले मुद्दे? राजेश टोपेंनी दिली सविस्तर माहिती
चित्रा वाघ यांनी बँक निवडणुकीच्या संबंधित ट्विट केलं होतं. त्याच ट्विटला रुपाली पाटील यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ‘जोर का झटका धिरेसे कसा असतो ते अर्ध्या हळकुंडानी पिवळे झालेल्यांना समजलं असेल. तेरे वार पर पलटवार हु मै …मुंबैबँक अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे.’ असे ट्वीट करत रुपाली पाटील ठोंबरे यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.
दुकानांवरील मराठी पाट्यांच श्रेय कुणाचं? राज ठाकरेंच्या दाव्यावर संजय राऊत म्हणतात…
‘मुंबै बँकत भाजपचे गेल्या कित्तेक वर्षापासून वर्चस्व होते. यावेळी झालेल्या निवडणूकीत दरेकर यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलचा विजय झाला. सर्वच २१ जागा जिंकल्या. मतदारांनी बँकेच्या कारभारावर विश्वास दर्शवलाय सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन! प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’ असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले होते. यावरच रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिउत्तर देत टोला लगावला आहे.
जोर का झटका धिरेसे …
कसा असतो ते अर्ध्या हळकुंडानी पिवळे झालेल्याना समजलं असेल
तेरे वार पर पलटवार हु मै …#मुंबईबँक अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड pic.twitter.com/ctjhLTNJ9O— Rupalipatilthombare (@Rupalispeak) January 14, 2022
बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेसचे सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळाली तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली आहेत. भाजपकडे १० मते होती, विष्णू भुंबरे हे फुटले, त्यामुळे महाविकास आघाडीला ११ मते मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने दबाव आणला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली,असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
Read also:
- आमदार श्वेता महालेंनी खोचले पदर; बँकेच्या व्यवस्थापकास झाप-झाप झापले, काय घडलं नेमकं…
- तिसरी लाट आली, ठाकरे सरकार लवकर जागे व्हा; नागपूर खंडपीठाने सरकारला फटकारलं
- राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे; चंद्रकांत पाटीलांची खळबळजनक टीका
- शहापूरात शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी अघोरी प्रकार; धक्कादायक फोटोस झाले व्हायरलं
- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात; 1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार