पुणे : माझे पती जेव्हा स्वतः हुन माझ्याजवळ आणि मिडियासमोर येतील आणि ‘पम्मी, तुम जिती मै हारा’ असं जेव्हा म्हणतील, शपथविधीमध्ये जेव्हा ते माझं नाव घेतील तेव्हाच मला न्याय मिळाला असं मी समजेन, मला अजूनही न्याय मिळाला नाही. पण मी समाधानी आहे, असं करुणा धनंजय मुंडे यांनी सांगितले.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात; 1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार
करुणा मुंडे पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. करुणा मुंडे यांनी आज पुण्यात एका कामगार संघटनेत प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राज्यभरात पक्षाचा विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, माझ्या पक्षाचा नारा वेगळा आहे.. कार्यकर्ता समोर असेल आणि त्याच्या पाठीमागे करुणा मुंडे असतील. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर आधी कार्यकर्त्यांना उमेदवारी देईन. माझ्यावर निवडणूक लढवण्याची वेळ आलीच तर परळी गावातून आमदारकीची निवडणूक लढवेन. धनंजय मुंडे विरोधात निवडणूक लढविली. नवरा विरुद्ध बायको अशी ही लढत असेल.
शहापूरात शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी अघोरी प्रकार; धक्कादायक फोटोस झाले व्हायरलं
धनंजय मुंडेंना मी जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा मी सोळा वर्षाची होते. ही जास्त काही बोलणार नाही असं म्हणून त्यांनी मला या प्रकरणात ढकललं. ही कुणाला काही बोलणार नाही, काही दिवस फडफडेल आणि घरात शांत बसून राहील असं त्यांना वाटलं असावं. परंतु देवाला काही वेगळेच मंजूर होते. मी आता माझा स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर माझं धनंजय मुंडेंशी बोलणं झालं. मी खूप चांगलं करते अस देखील त्यांनी मला सांगितलं. मला त्यांच्याकडून आतापर्यंत न्याय मिळाला नाही, मी स्वतः न्याय मिळवून घेतला. 1998 पासून मी भारतीय जनता पक्षात होते. पाच महिने मी पक्षाचं काम केलं. मी बाहेर जाणं माझ्या नवऱ्याला आवडत नसल्यामुळे मी पक्ष सोडून दिला आणि घरात बसले. परंतु मी आता पुन्हा राजकारणात आले आहे.
Read also:
- तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा – चंद्रकांत पाटील
- चित्रा ताई… “तेरे वार पर पलटवार हु मै”; राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांचा निशाणा
- आमदार श्वेता महालेंनी खोचले पदर; बँकेच्या व्यवस्थापकास झाप-झाप झापले, काय घडलं नेमकं…
- तिसरी लाट आली, ठाकरे सरकार लवकर जागे व्हा; नागपूर खंडपीठाने सरकारला फटकारलं
- राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे; चंद्रकांत पाटीलांची खळबळजनक टीका