पणजी : देशात आता ५ राज्यांमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मतदान जरी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार असलं तरी पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हा १० मार्च रोजी लागणार आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकांसाठी राजकारण चांगलेच पेटलेले दिसत आहे.
राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे; चंद्रकांत पाटीलांची खळबळजनक टीका
महाराष्ट्रात सत्तेत असणारी शिवसेना आता भारतीय जनता पक्षाला इतरही राज्यांमध्ये कडवी झुंझ देण्याची शक्यता आहे. गोवा आणि उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे यावेळी अयोध्येतून लढणार असल्याची चर्चा सुरु आहे. आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील मुख्य नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
तिसरी लाट आली, ठाकरे सरकार लवकर जागे व्हा; नागपूर खंडपीठाने सरकारला फटकारलं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे कसं तर पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया उसके जैसा असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावात राष्ट्रवादी आहे म्हणजे पक्ष लगेच राष्ट्रीय होतो असं काही नसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील आहे. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा केली तरी त्याचा फायदा नसतो, त्यासाठी गल्लीत उतराव लागतं. अश्या शब्दांत फडणविसांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस हे सध्या गोव्यात भारतीय जनता पक्षाकडून कमान सांभाळताना दिसत आहेत. याआधी त्यांनी शिवसेनेवर देखील टीका केली होती.
Read also:
- आता एसटीमध्ये खासगी, सेवानिवृत्त चालक घेतले जाणार; व्यवस्थापकीय संचालकांची मोठी घोषणा
- धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील, ‘पम्मी तुम जिती मै हारा’; करूणा मुंडेचा दावा
- तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा – चंद्रकांत पाटील
- चित्रा ताई… “तेरे वार पर पलटवार हु मै”; राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांचा निशाणा
- आमदार श्वेता महालेंनी खोचले पदर; बँकेच्या व्यवस्थापकास झाप-झाप झापले, काय घडलं नेमकं…