IMPIMP

पार्थ पवार एकटेच स्नेहभोजनासाठी श्रीनिवास पवारांच्या घरी…!

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतलीत्यानंतर आता पार्थ पवार नेमकी पुढील भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.

पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी आज पुण्यात झेंडावंदन केले. पार्थ पवारही काल पुण्यात आले होते. पार्थ पवारांची समजूत घालण्यासाठी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी बोलावले आहे. यासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ असे तिघे तिकडे जाणार होते. मात्र, अजित पवार जाणार नसल्याचे, तसेच पार्थ पवार एकटेच स्नेहभोजनासाठी येणार असल्याचे पवार कुटुंबीयांनी सांगितले आहे.

श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे धाकटे बंधू आहेत, ते राजकारणात सक्रीय नाहीत, ते उद्योजक आहेत. पण मागील वेळी अजित पवारांनी बंड केले होते तेव्हाही कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी श्रीनिवास पवारांनी पुढाकार घेतला होता.