पुणे : मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन. कमकुवत माणसाला काहीतरी आधार लागतो. मी कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही. कार्यकर्ता पद कुणी हिसकावूनही घेऊ शकत नाही. आमदार, खासदार, मंत्रीपद निघून जाईल, आणखी काही पद असतील ती जातील, पण कार्यकर्ता हे पद कधीही जात नाही असं बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. त्यावर आता भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंचे सगळे आजार गायब झालेत”; संदीपान भुमरेंची फटकेबाजी
सगळं काही नीट चालू असताना असे विषय काढू नये. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. वाढलेल्या पक्षाच्या आधारे स्वबळावर निवडणुका लढण्याचाही अधिकार आहे. तसा तो भाजपलाही आहे. असा सुचक इशारा चंद्रकांत पाटलांनी अब्दूल सत्तार यांना दिला आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
मोदींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचविण्याचे गिरीश खत्रींचं काम ; मोहोळ
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणआर आहे. त्यानंतर निवडणुक आयोग वेळ मागणार आहे. त्यानंतर निवडणुका लागतील. तोपर्यंत निवडणुका लांबणीवर पडणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका लांबणीवर पडणार आहेत आणि हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. असंही ते म्हणाले.
सरनाईकांवर जनहित याचिका दाखल..! दफन भूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडप केल्याचा आरोप
दरम्यान, माझ्या मतदारसंघात भाजपशी युती नको, या ठिकाणी मैत्रीपुर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपुर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
Read also
- “आता देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही, महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचे सरकार”;
- छगन भुजबळांवर गुन्हा दाखल..! जीवे ठार मारण्याची दिली धमकी
- “मोदींनीही आत्मनिर्भर व्हावं, किती दिवस दुसऱ्या पक्षातील माणसं पक्ष चालवणार”
- “सत्य, परखड बोलणारे भाजपचे एकमेव नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी”; रूपाली पाटील
- “प्रभू रामाच्या शिकवणीवर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरूय”