मुंबई : राष्ट्रवादीचे नेेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर दोघांविरूद्ध एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबुरमध्ये राहणारे व्यावसायिक ललितचंद टेकचंदानी यांनी त्यांच्याविरोदात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यावरून भाजपच्या नेत्यांकडून भुजबळांवर निशाणा साधण्यात आला आहे.
सरनाईकांवर जनहित याचिका दाखल..! दफन भूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडप केल्याचा आरोप
चेंबूरचे व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते ललित टेकचंदानी यांना ‘तू भुजबळ साहेबांना संदेश पाठवतो, तुझा घरी येऊन गोळ्या टाकतो. मी दुबईची लोकं लावतो, भुजबळ साहेबांना मेसेज करणं महागात पडेल’, अशा शब्दात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकीमागे कोण आहे? त्यांना भुजबळांचा पाठिंबा होता काय? सरस्वती मातेचा अपमान करणारे नास्तिक छगन भुजबळ यांचे घोटाळ्याव्यतिरिक्त अंडरवर्ल्ड आणि पीएफआयशीही संबंध आहे का? याची सखोल चौकशी व्हायला हवी. अशी मागणी विधान परिषदेच्या माजी विरोधी पक्षनेेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
“मला कुत्रा निशाणी दिली तरी निवडून येईन, माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको”; अब्दुल सत्तार
तर याप्रकरणात भाजप नेते नितेश राणे यांनी देखील भुजबळांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, चेंबूरमध्ये राहणारे व्यावसायिक ललितचंद टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर छगन भुजबळ आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन आणि मेसेजद्वारे धमकावल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे.
“जर RSS वर बंदी घालण्याची मागणी होत असेल तर…;”सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
दरम्यान, अलिकडेच छगन भुजबळ यांनी ज्या शारदा, सरसस्वती मातेला आम्ही कधी पाहिलं नाही. तिने आम्हाला काही शिकवलं नाही. त्यांचं फोटो शाळेत का लावले जातात. असा सवाल केला होता. त्यानंतर राज्यात भाजप आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले.
Read also
- “मोदींनीही आत्मनिर्भर व्हावं, किती दिवस दुसऱ्या पक्षातील माणसं पक्ष चालवणार”
- “सत्य, परखड बोलणारे भाजपचे एकमेव नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी”; रूपाली पाटील
- “प्रभू रामाच्या शिकवणीवर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरूय”
- “एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंचे सगळे आजार गायब झालेत”; संदीपान भुमरेंची फटकेबाजी
- मोदींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचविण्याचे गिरीश खत्रींचं काम ; मोहोळ