मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीला या प्रश्नावर कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. आता मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी, आरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी भाजपने एक समिती गठीत केली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, विनायक मेटे, नरेंद्र पाटील आणि श्रीकांत भारतीय यांचा समावेश आहे. यासंदर्भात भाजप नेत्यांची पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाजपचा मराठा समाजाच्या आंदोलनाला, त्यांना रचनात्मक पाठबळ देण्यासाठी पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि मराठा समाजाच्या सोबत आहे. त्या अनुषंगाने मराठा आरक्षणासाठी दिशादर्शक कृती ठरविण्यासाठी भाजप नेत्यांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. @BJP4Maharashtra pic.twitter.com/pBflbCApcb
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 16, 2021
दरेकर म्हणाले की, भारतीय जनता पक्ष मराठा आरक्षण, मराठा समाजाच्या सोबत आहे. काही दिवसांपूर्वी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली होती, त्यात 5 जणांची समिती गठीत करण्यात आली. ही समिती नेमके काय चुकले, भविष्यात काय व्हायला हवे यासंदर्भात तज्ञांशी चर्चा करून अहवाल तयार करेल, एक्शन प्लॅन तयार करेल. मराठा समाजाला एक आश्वासक पाठबळ देण्याचे काम करणार आहोत.
मराठा समाजाचे आंदोलन असो, रचनात्मक पाठबळ देणे असो, आज जो भयभयीत मराठा समाज आहे, त्याला भाजप निश्चित दिलासा देईल, त्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रवीण दरेकरांनी दिली.
Read Also :
- संजय गायकवाडांनी शब्द पाळला, थेट चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे केले वाटप
- नाशिकमध्ये व्यापाऱ्यांची दुकाने होणार सुरु? छगन भुजबळ घेणार आढावा बैठक
- ‘राज्याबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना चांगल्या गोष्टी पचत नाहीत’
- माझ्या जिवाभावाचा मित्र एकटाच निघून गेला; आव्हाडांची फेसबुकवर भावनिक पोस्ट
- मराठा आरक्षणाचा खून! आघाडीची अशी पोलखोल करणार भाजप