बुलडाणा : बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. संजय गायकवाड यांनी करोनाला हरवण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी चिकन, मटन आणि अंडी खाण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र, आता गायकवाड यांनी आपला शब्द पाळत कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे वाटप केले आहे.
गायकवाड यांनी बुलडाण्याच्या स्त्री रुग्णालयातील करोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाऊन चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे वाटप केले. रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मांसाहार करण्याचा डायट प्लॅन असल्याचे गायकवाड म्हणाले.
या आधी ‘करोनाला हरवण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. ही शक्ती चिकन, मटन आणि अंडे खाल्ल्याने वाढेल यासाठी मासाहारी पदार्थ सेवन करा,’ असं आवाहन संजय गायकवाड यांनी केले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर काही वारकऱ्यांनी आक्षेप घेत त्यांना जाब विचारला होता. एका वारकरी आणि गायकवाड यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली होती.
टीकेनंतर देखील संजय गायकवाड आपल्या वक्तव्यावर ठाम राहत त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले होते. तप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का?, असा सवाल त्यांनी टीका करणाऱ्यांना विचारला होता.
Read Also :
- नाशिकमध्ये व्यापाऱ्यांची दुकाने होणार सुरु? छगन भुजबळ घेणार आढावा बैठक
- ‘राज्याबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना चांगल्या गोष्टी पचत नाहीत’
- माझ्या जिवाभावाचा मित्र एकटाच निघून गेला; आव्हाडांची फेसबुकवर भावनिक पोस्ट
- मराठा आरक्षणाचा खून! आघाडीची अशी पोलखोल करणार भाजप
- ‘कांगावेखोरांना उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही’