मुंबई : मागील सरकारच्या काळात खूप त्रास झाला. पण महाआघाडीचे सरकार आल्यानंतर न्याय मिळाला. काम करायला संधी मिळाली, असे वक्तव्य प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. लहान यांच्या या वक्तव्यानंतर आता सत्ताधारी-विरोधी पक्षामध्ये टीकाटिप्पणी सुरू झाली आहे.
डॉ. तात्याराव लहाने यांच्या गौप्यस्फोटानंतर आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. प्रशासनाच्या एका वरिष्ठ पदावर रुजू असताना तात्याराव लहाने यांनी प्रशासनाच्या अंतर्गत वादाला माध्यमांसमोर आणणे योग्य नाही, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. ते टिव्ही9 मराठीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
प्रवीण दरेकर म्हणाले की, प्रशासन आणि शासनात कुणीही कुणाला त्रास देऊ नये. सलोख्याने प्रशासन चालावं असं सर्वांना अपेक्षित असतं. डॉ. तात्याराव लहान हे एका वरिष्ठ पदावर रुजू आहेत. त्यांनी प्रशासन आणि शासन यांच्यातील अंतर्गत वादाला माध्यमांसमोर आणणे योग्य नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडी येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना लहाने म्हणाले होते की, मागील सरकारने मला खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकारमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी माझी बाजू मांडून मला शासनस्तरावर काम करण्याची संधी दिली.
Read Also :
- … त्यासाठी मी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानतो – रोहित पवार
- राहुल गांधींना त्वरित अध्यक्ष करा, दिल्ली काँग्रेसकडून प्रस्ताव मंजूर
- ‘शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत, पण…’, केंद्रीय कृषीमंत्र्यांचे प्रत्युत्तर
- छत्रपती शिवाजी महाराज कन्नड भूमीतले, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा विचित्र दावा
- संजय राऊतांच्या लेकीचा साखरपुडा संपन्न, जावई आहेत तरी कोण ?