मुंबई : त्रासदायक सरकारला सत्तेबाहेर घालवल्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. नेत्रतज्ञ व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी फडणवीस सरकारच्या काळात अधिक त्रास झाला, असे वक्तव्य केले होते, हाच धागा धरत रोहित पवारांनी फडणवीस सरकारला टोला लगावला.
मागील सरकारने मला खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकारमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी माझी बाजू मांडून मला शासनस्तरावर काम करण्याची संधी दिली, असा गौप्यस्फोट डॉ. तात्याराव लहाने यांनी केला होता.
अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडी येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
सर्वसामान्यांप्रमाणे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासारख्या सेवाव्रती व्यक्तीलाही मागील सरकारने त्रास दिल्याचं वृत्त वाचून धक्का बसला. अशा त्रासदायक सरकारला सत्तेबाहेर घालवल्याबद्दल मी #मविआ च्या नेत्यांचे आभार मानतो.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 31, 2021
लहाने यांच्या या गौप्यस्फोटानंतर आमदार रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, सर्वसामान्यांप्रमाणे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासारख्या सेवाव्रती व्यक्तीलाही मागील सरकारने त्रास दिल्याचं वृत्त वाचून धक्का बसला. अशा त्रासदायक सरकारला सत्तेबाहेर घालवल्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानतो.
Read Also :
- राहुल गांधींना त्वरित अध्यक्ष करा, दिल्ली काँग्रेसकडून प्रस्ताव मंजूर
- ‘शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत, पण…’, केंद्रीय कृषीमंत्र्यांचे प्रत्युत्तर
- छत्रपती शिवाजी महाराज कन्नड भूमीतले, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा विचित्र दावा
- संजय राऊतांच्या लेकीचा साखरपुडा संपन्न, जावई आहेत तरी कोण ?
- आज अर्थसंकल्प! अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार कोणत्या घोषणा करणार ?