मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी काल लक्ष्यवेधी मांडताना सरकारवर राजकीय बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकार आणि सरकारी वकिल मिळून विरोधकांना संपवण्याचा डाव आखण्यात आला असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर प्रवीण चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना माझा कोणत्याही सरकारशी संबंध नसल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर मी कोणतीही निवडणुक लढवली नाही. माझ्याकडून असं कुठलंही काम झालं नाही. व्हिडीओमधील फेरफार असल्याने ते आज ना उद्या बाहेर येईल. मी अजूनही व्हिडीओ पाहिला नाही. त्यातील आवाज ऐकला नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी माझी कितीही चौकशी करावी! किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला आवाहन
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेला पेन ड्राईव्ह हे तर पोली स नाही तर फॉरेन्सिक विभागत तपासतो. याचा तपास बाहेरील राज्यातही करता येईल. कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही. तर सरकार ठरवतं असंही ते म्हणाले.
ठाकरे सरकारकडून गिरीश महाजनांसोबत इतर नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न ! फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल
अर्थसंकल्पीय अधिवेशात लक्ष्यवेधी मांडताना विधानसभा उपाध्यक्षांकडे एक पेन ड्राव्हई दिला आहे. त्या पेन ड्राईव्ह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी विरोधकांना संपवण्याचा षड़यंत्र रचले असून त्यात व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासंबंधित काही वादग्रस्त वक्तव्य त्या पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काही काळात राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
Read also:
- ठाकरे सरकारकडून गिरीश महाजनांसोबत इतर नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न ! फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल
- मग नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही, नवाब मलिकांवरील कारवाई अयोग्य- शरद पवार
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला