मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी भुखंड गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. मागील कित्येक दिवसापासून इडीचं शुल्ककाष्ट वायकरांच्या पाठीमागे लागले आहेत. यासंदर्भात त्यांची अनेकदा चौकशी देखील झाली आहे. यातच आता त्यांना शिंदे गटाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
हेही वाचा…कॉंग्रेससोबतचा 48 वर्षाचा प्रवास संपुष्टात..! मुंबईतील कॉंग्रेसचे ‘मास लीडर’ म्हणून ओळख, कोण आहेत बाबा सिद्दीकी ?
संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. येत्या काही दिवसात शिवसेना सोडा. पक्षांतर करा. नाहीतर तुरुंगात जा. असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे. असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते. रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत .ते लढतील व जिंकतील. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत. असंही राऊतांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे उतरले मैदानात , कोकण दौऱ्यानंतर आता मुंबई अन् त्यानंतर मराठवाडा
दरम्यान, पक्ष फुटीनंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा सुरू झाला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच युवा नेते सुरज चव्हाण यांची याआधी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता रवींद्र वायकर, राजन विचारे, अनिल परब इत्यादी नेत्यांवर देखील केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखविला जात आहे.
शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे..येत्या काही दिवसात शिवसेना सोडा..पक्षांतर करा.. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे.हा एक प्रकारे दहशतवाद आहे.असे राजकारण या आधी… pic.twitter.com/TnHmpShnAm
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“पुण्यात अजित पवार गटाने कार्यालयावर ताबेमारी केली तर..” जयंत पाटलांनी दिला थेट इशारा
हेही वाचा…“शिंदे गँग च्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा”, राऊतांचे सलग चार दिवस ट्विटवॉर
हेही वाचा….“राजकारणात बाप बदलण्याची नवीन पद्धत आली”, शरद पवार गटाचा जोरदार घणाघात
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर आता पक्षाचा निधीही जाणार ? शरद पवार गटाला धक्का बसणार ?
हेही वाचा…“राज्यात सध्या पुतण्यांचे दिवस..!” राज्यात आणखी एका ‘काका पुतण्यात’ रंगलं राजकारण