आजच्या बैठकीमधअये सर्वांनी शरद पवार साहेबांच्या बरोबर राहण्याचा निर्धार केला आणि कार्यकर्त्यांमधला उत्साह देखील प्रचंड होता याची अनुभूती आम्हाला चांगलीच अनुभवायला मिळाली.प्रशांत जगताप यांनी त्यांच्या नावावर कायदेशीर करार पुण्यातील पक्ष कार्यालयासंबंधात पुर्वीपासून केलेला आहे. त्यामुळे, त्यात कायदेशीर अडचण काही असेल असे मला वाटत नाही. अशी ताबेमारी केली, तर पुण्यात प्रतिमा बिघडते हे त्यांना माहिती असेल अशी आमची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे उतरले मैदानात , कोकण दौऱ्यानंतर आता मुंबई अन् त्यानंतर मराठवाडा
पुढे बोलतांना ते म्हणाले की, लोकमान्यतेने सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून व सर्वसामान्य जनता सर्व समाज माध्यमातून आम्हाला त्यांचे मत चिन्हाबाबत कळवत आहे, या सर्व बाबतीत पवार साहेब योग्य विचार करून योग्य निर्णय ठरवतील. आजही मी पाहिले, इथले स्थानिक आमदार चेतन तुपे यांच्या बोर्डवर साहेबांचा फोटो वापरलेला होता. जनतेच्या समोर जाण्यासाठी आजपर्यंत आम्ही आदरणीय पवार साहेबांचा फोटो वापरलेला आहे.
पवार साहेबांना सर्व मान्यता होती. त्यामुळे आता अशी अपेक्षा आहे की राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्यातच कार्यकर्ते आणि उमेदवारांना साहेबांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे. वैयक्तिक पाठिंबा निवडणुकीत द्यायचा नसतो. मी ज्या पक्षाचा प्रमुख आहे. त्या पक्षाने ठरवलं तर तो पाठिंबा जाहीर आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा….“कार्यालयातून घड्याळ चिन्ह काढतांना पवार साहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या डोळ्यात आलं पाणी”, व्हिडीओ व्हायरल
आमच्या वतीने या मतदारसघात प्रशांत जगताप हे चांगले काम, चांगली संघटना बांधत आहेत. आम्ही उमेदवार जाहीर केलेला नाही, ते इथे चांगले प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचा उमेदवार येथे जाहीर होऊ शकतो. उमेदवार जाहीर करायला विधानसभेच्या निवडणुका लागणे आवश्यक आहे.सर्व देशाने पाहिलेलं आहे , पक्ष फोडला गेलेला आहे. लोक तिकडे गेलेले आहेत. सर्वसामान्य जनता हूशार आहे. साहेब हे राज्यसभेचे सदस्य आहेत. अजून दीड-दोन वर्ष त्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे ते निवडणुकीत उभे राहण्याचा प्रश्न उद्धवत नाही. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदे गँग च्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा”, राऊतांचे सलग चार दिवस ट्विटवॉर
हेही वाचा….“राजकारणात बाप बदलण्याची नवीन पद्धत आली”, शरद पवार गटाचा जोरदार घणाघात
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर आता पक्षाचा निधीही जाणार ? शरद पवार गटाला धक्का बसणार ?
हेही वाचा…“राज्यात सध्या पुतण्यांचे दिवस..!” राज्यात आणखी एका ‘काका पुतण्यात’ रंगलं राजकारण
हेही वाचा…कॉंग्रेससोबतचा 48 वर्षाचा प्रवास संपुष्टात..! मुंबईतील कॉंग्रेसचे ‘मास लीडर’ म्हणून ओळख, कोण आहेत बाबा सिद्दीकी ?