नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कृषी कायदे आणि चीनच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. चीनच्या मुद्यावर प्रश्न विचारणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर देखील त्यांनी यावेळी हल्ला चढवत कोण जेपी नड्डा ? अशी बोचरी टीका केली आहे.
जे.पी. नड्डा यांनी चीनच्या मुद्यावरून राहुल गांधी यांनी खोटं बोलणे बंद करावे, असा सल्ला देत नड्डा यांनी काही प्रश्न विचारले होते. याबाबत राहुल गांधींना विचारले असता, कोण जेपी नड्डा ? मी का त्यांना उत्तर देऊ ?, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.
छत्तीसगढ़ की सड़कों पर ये सवाल आम है..🤔 pic.twitter.com/31J26rqUUs
— INC Chhattisgarh (@INCChhattisgarh) January 19, 2021
जेपी नड्डा माझे प्रोफेसर आहेत का ज्यांना मी उत्तर देत फिरु. मी देशाचे शेतकरी आणि जनतेला उत्तर देणार. मी त्यांचा आवाज उठवणार. कुणी कितीही टीका केली तरी मी लढणार, असे राहुल गांधी म्हणाले.
माझं एक व्यक्तिमत्व आहे. मी ना नरेंद्र मोदींना घाबरतो, ना इतर कुणाला घाबरतो. . मी स्वच्छ चारित्र्याचा आहे. मला हे लोक स्पर्शही करू शकत नाहीत. हा, गोळी घालू शकतात. मी देशभक्त आहे. माझ्या देशाचं रक्षण करतो आणि यापुढेही करत राहीन. मी एकटा उभा राहीन, पूर्ण देश एका बाजूला झाला तरी देशासाठी उभा राहीन, असेही ते म्हणाले.
Read Also :
- संसदेत खासदारांना मिळणाऱ्या जेवणावरील अनुदान बंद, पदार्थ महागणार
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची वर्णी ?
- उद्धव ठाकरे, शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार
- पहाटेच्या सरकारचे खरे सूत्रधार शरद पवारच – देवेंद्र फडणवीस
- ‘मतांच्या चिंतेमुळेच शिवसेनेने ‘नामांतरा’चा सामना सुरू केला’, थोरातांचे जोरदार उत्तर