IMPIMP

नव्या वर्षात मुंबई लोकल सुरु होणार? आरोग्यमंत्री म्हणाले…

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून मुंबई लोकल सेवा बंद आहे. काही दिवसांपुर्वी महिला आणि काही कर्मचारी वर्गांसाठी लोकल सुरू करण्यात आली असली तरी, अद्याप सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे सेवा सुरू करण्यात आलेली नाही. आता नवीन वर्षात देखील लोकल सर्वसामान्यांसाठी धावणार का ? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नव्या वर्षात कोरोना रुग्णांच्या संख्येवरून लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

नव्या वर्षात कोरोना रुग्णांची संख्या काय आहे ते आम्ही बघणार आहोत. जर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली नाही तर लोकल ट्रेनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच सकारात्मक विचार करतील. आम्हाला ठावूक आहे की, लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. सध्या सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या 8 महिन्यांपासून मुंबई लोकल सेवा बंद आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सेवा सुरू करणार असल्याचे संकेत देखील महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देण्यात आले होते.