बारातमी : पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रविराज तावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते समजले जातात. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची घटना घडली.
रविराज तावरे हे पत्नीसह संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या ऑडी कारने संभाजीनगर येथे वडापाव घेण्यासाठी आले होते. ते वडापाव घेण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यांनी वडापाव विकत घेतला. दुकानदाराला पैसे दिले. त्यानंतर ते गाडीच्या दिशेला वळले. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात रविराज यांच्या पोटात गोळी लागली आणि ते जमिनीवर कोसळले.
गोळी लागल्यानंतर रविराज यांना दुसऱ्या एका खासगी वाहनातून उपचारांसाठी बारामतीला नेण्यात आलं. या घटनेमुळे बारामती तालुका हादरला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गोळीबार का करण्यात आला यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Read Also :
- ‘निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली, पण आम्हीच संपवणार हे निश्चित’
- ‘अनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे’
- ‘महाराष्ट्रातील 12 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी असलेला चेक वठणार कधी?’
- ‘70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात मोदी सरकारने विकायला काढलं’
- 12वीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी, म्हणाले…