नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. मागील दोन दिवसांपासून प्राप्तिकर विभागाच्या) अधिकाऱ्यांकडून बेनामी संपत्ती प्रकरणी वाड्रा यांची चौकशी केली. यानंतर बोलताना त्यांनी राजकारणात येण्याबाबत संकेत दिले आहेत.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना वाड्रा म्हणाले की, राजकीय कुटुंबाशी संबंधित असल्यामुळे मला त्रास दिला जात आहे. राजकारणात नसतानाही राजकीय लढाई लढत आहेत. जेव्हा जेव्हा सरकार संकटात असते तेव्हा माझा वापर पंचिंग बॅग म्हणून केला जातो.
मला असे वाटते की स्वतःची लढाई लढण्यासाठी संसदेत असणे आवश्यक आहे. मी बाहेरून ही लढाई खूप दिवस लढलो. मी स्वतःला अनेकदा समजावले, मात्र मी राजकारणात नसल्याने ते मला त्रास देत आहेत, असेही वाड्रा म्हणाले.
वाड्रा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी रायबरेली आणि अमेठीत प्रचार केला होता. सोनिया गांधी आणि राहुल गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मुरादाबादमध्ये वाड्रा यांच्यासाठी होर्डिंग्स देखील लावण्यात आले. यावर आपले बालपण या ठिकाणी गेले होते आणि मी इथेच रहावे अशी इथल्या लोकांनी इच्छा होती, असे वाड्रा म्हणाले. कुटुंबाने परवानगी दिल्यास मी नक्कीच निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
Read Also :
- ‘औरंगाबाद विमानतळाला अजिंठा-वेरूळ लेणीचे नाव द्या’, आठवलेंची मागणी
- … तर 2014 साली काँग्रेसलाच सत्ता स्थापनेसाठी बोलवले असते, प्रणब मुखर्जींच्या पुस्तकात गौप्यस्फोट
- गृहमंत्री पोलीस भरतीबाबत शुद्धी परिपत्रक काढणार, मेटेंचा दावा
- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवून देऊया – उद्धव ठाकरे
- भाजप आमदाराला मुंबई पोलिसांची नोटीस, बीएमसीतील घोटाळ्याचा आरोप