मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांना विविध प्रकरणात ईडीकडून नोटीस बजावली जात असताना आता भाजप आमदार मुंबई पोलिसांच्या निशाण्यावर आले आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
प्रसाद लाड यांच्यावर 2009 साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असून, याप्रकरणी 2014 साली त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. टिव्ही9 मराठीने या संदर्भात वृत्त दिले आहे.
प्रसाद लाड यांनी 20 दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. आता त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर देखील एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, ईडीकडून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील कथित पीएमसी बँक घोटाळ्यात नोटीस बजावण्यात आली होती.
Read Also :
- अमेरिकन संसदेतील हिंसाचारावर पंतप्रधान मोदी म्हणाले…
- ट्रम्प समर्थकांकडून अमेरिकन संसदेत घुसून तोडफोड
- ‘आमच्यावर टीका केल्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाहीत’ शिवसेना नेत्याचा भाजपला टोला
- …म्हणून पहिला मान धनंजयचा! सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडेंचे आभार
- ‘संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, नामांतराचे राजकारण खेळू नये’, काँग्रेसने CMO ला ठणकावले
- CMO कडून औरंगाबादसंदर्भात करण्यात आलेले ‘ते’ ट्विट चर्चेत
- SEBC आरक्षण न ठेवता पोलीस भरती, ठाकरे सरकारचा निर्णय