नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्रपती निवडणुकीत झालेला पराभव मान्य नसल्याने त्यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल अर्थात संसदेमध्ये घुसून तोडफोड केली आहे. या घटनेत एका महिलेचा देखील मृत्यू झाला आहे.
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले असून, अमेरिकेत झालेल्या हिंसाचाराच्या वृत्ताने त्रास झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Distressed to see news about rioting and violence in Washington DC. Orderly and peaceful transfer of power must continue. The democratic process cannot be allowed to be subverted through unlawful protests.
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले की, वॉशिंग्टन डी. सी.मध्ये दंगल आणि हिंसाचाराबद्दलच्या बातम्या पाहून अस्वस्थ झालो आहे. व्यवस्थित आणि शांततेत सत्ता हस्तांतरण सुरूच राहिले पाहिजे. बेकायदेशीर निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला डाग लागू दिला जाऊ शकत नाही.
दरम्यान, निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसून तोडफोड करण्यास सुरुवात केली. या हल्ल्या प्रकरणी 13 लोकांना अटक करण्यात आली आहे.
Read Also :
- ट्रम्प समर्थकांकडून अमेरिकन संसदेत घुसून तोडफोड
- ‘आमच्यावर टीका केल्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाहीत’ शिवसेना नेत्याचा भाजपला टोला
- …म्हणून पहिला मान धनंजयचा! सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडेंचे आभार
- ‘संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, नामांतराचे राजकारण खेळू नये’, काँग्रेसने CMO ला ठणकावले
- CMO कडून औरंगाबादसंदर्भात करण्यात आलेले ‘ते’ ट्विट चर्चेत
- SEBC आरक्षण न ठेवता पोलीस भरती, ठाकरे सरकारचा निर्णय