मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. तसेच, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केला होता. याप्रकरणी आता एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
महापौर पेडणेकरांना धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी गुजरातच्या जामनगरमधून ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच नावे मनोज दोढीया असून तो 20 वर्षाचा आहे.
किशोरी पेडणेकर यांना मागील महिन्यात 21 डिसेंबर रोजी अज्ञात नंबरवरून कॉल आला होता, या कॉलवरून किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, मुंबईच्या आज्ञाद मैदान पोलीस ठाण्यात याबाबत किशोरी पेडणेकर यांच्याकडून तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर पेडणेकर यांनी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना देखील माहिती दिली होती.
धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासांच्या आत अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.
Read Also :
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवून देऊया – उद्धव ठाकरे
- भाजप आमदाराला मुंबई पोलिसांची नोटीस, बीएमसीतील घोटाळ्याचा आरोप
- अमेरिकन संसदेतील हिंसाचारावर पंतप्रधान मोदी म्हणाले…
- ट्रम्प समर्थकांकडून अमेरिकन संसदेत घुसून तोडफोड
- ‘आमच्यावर टीका केल्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाहीत’ शिवसेना नेत्याचा भाजपला टोला
- …म्हणून पहिला मान धनंजयचा! सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडेंचे आभार