बीड : भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषत परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांनी केला आहे. यातच मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार देखील झाल्याचे रोहित पवारांनी म्हटलयं. त्यावर आता महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात”
बीडच्यासंदर्भात रोहित पवारांनी थेट व्हिडीओच समोर आणला आहे. यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिमंत बबनभाऊ गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवली. निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणारे आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे ? असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत . असेही रोहित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“महायुतीचं बटन इतक्या जोरात दाबा की, पाकिस्तानात ‘मातम’ सुरु झाला पाहिजे”
यावर ज्यांनी कोणी तक्रार केली आहे. त्यांनी निवडणुक आयोगात करावी. आतापर्यंत जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो. तेव्हा आम्ही १५ आमदार लावले होते. त्यांनी तेव्हाही असचं केलं होतं. त्यामुळे यावेळी देखील त्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे. खेड्याच्या भाषेत ते चिडी करत आहेत. परंतु निवडणुका लागल्या की अशा घटना घडतात. असं म्हणत पंकजा मुंडेंनी रोहित पवारांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
भाजपकडून #बीड_लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची हि दडपशाही रोखण्याची हिम्मत बबनभाऊ गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकत्यांनी दाखवली.
निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष… pic.twitter.com/O3cDBaE3jc
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 18, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“भाजपकडून मुंबईत कोट्यवधी रूपये लोकांना वाटले”, दानवेंचा खळबळजनक आरोप
हेही वाचा..“आपले अधिकार उध्वस्त झाल्याशिवाय हे गृहस्थ स्वस्थ बसणार नाहीत”, शरद पवारांचा मोदींना टोला
हेही वाचा..“भाजपला आता संघाची गरज उरली नाही”, जे.पी. नड्डांचं वक्तव्य चर्चेत
हेही वाचा..संजय काकडेंनी घेतला अटक वॉरंटचा धसका, तक्रारदाराला बोलवून सुपूर्द केला धनादेश
हेही वाचा..“राज ठाकरे मोदींच्या चरणी लीन झालेत,” कुणी लगावला टोला ?