पुणे : निवडणुक आयोगाने उद्धव ठाकरे यांना मशाल हे निवडणुक चिन्ह दिलं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देऊन शिंदे गटाने सादर केलेले चिन्ह निवडणून आयोगाने बाद ठरविले आहेत. त्यांना आज परत निवडणुक चिन्ह सादर करण्यास सांगितले आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी शिंदे गटाला टोला हाणला आहे.
“कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव”; भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट, नागरिकांकडून संताप
त्रिशूळ, व उगवता सुर्य दोन्ही गटाने सादर केल्यामुळे हे चिन्ह बाद करण्यात आले. तर शिंदे गटाने तिसर चिन्ह हे गदा सादर केलं होतं. परंतु ते चिन्ह धार्मिक असल्याने निवडणुक आयोगाने ते देखील फेटाळून लावले. यावरून गद्दाराना एकनिष्ठ रामभक्त बजरंग बलीची गदा झेपली नसती म्हणून कदाचित त्यांना मिळाली नसेल. दुसरा चिन्हाचा पर्याय मिंधेसनेचे प्रमुख, मुख्यमंत्र्यांच्या स्टाफला शिव्या हासाडणारे अब्दुल सत्तार यांनी सुचवलाच आहे. कुत्रा म्हणून. ती द्यावी. असं म्हणत रूपाली पाटील यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
“शिंदे गटाने सुचवलेल्या तीन नावांत बाळासाहेबांचा उल्लेख”; आज फैसला होणार?
काल निवडणुक आयोगाने दोन्ही गटाला नावं दिली. परंतु एकनाथ शिंदे यांच्या गटाला अद्यापही चिन्ह मिळालेलं नाही. त्यांना आज मिळण्याची शक्यता आहे. अंधेरी पुर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आता उद्धव ठाकरे यांना चिन्ह पोहवचण्यासाठी मोठं कष्ट करावं लागणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार दिल्याने शिंदे गट माघार घेण्याची शक्यता आहे.अशातच महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्याने ही लढत उद्धव ठाकरे विरूद्ध भाजप होणार आहे.
Read also
- “उद्धव ठाकरे ज्यावेळी सोनिया गांधी समोर झुकले, त्याचवेळी भाजपचा कार्यकर्ता म्हणून दु:ख झालं”
- “हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळे प्रभु श्रीरामाने ‘धनुष्यबाण’ हिसकावलं”
- “बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हॅक झाल्याने मला अतिव दु:ख”; सुधीर मुनगंटीवार
- “उद्धवजी तुम्ही लढा..आम्ही आहोत तुमच्यासोबत”; काॅंग्रेसचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा
- “नावात काय आहे ? शिवसेना हे नाव जरी गोठवलं तरी..;” संजय राऊतांचं स्पिरीट