मुंबई : शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पुर्व विधानसभेची जागा रिक्त झाली. त्या जागेवर आता पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने आपली उमेदवारी दिली आहे. राज्यातील राजकारण पेटत असताना आता काॅंग्रेसने देखील शिवसेनेला आपला पाठिंबा दिला आहे.
अब्दुल सत्तारांची सचिवाला शिवीगाळ..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज
अंधेरी पोट निवडणुकीत भाजप आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपला अद्दल घडविण्यासाठी राष्ट्रावादीसह आता काॅंग्रेसने देखील आपला पाठिंबा उद्धव ठाकरे यांना जाहिर केला आहे. आज काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, अमित विलासराव देशमुख, प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
काॅंग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, अॅड अनिल परब उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील या अगोदर अंधेरी पोटनिवडणुकीत आपला पाठिंबा शिवसेनेला जाहीर केल्याचं म्हटलं आहे.
“….तर आपण आगामी निवडणुकीत १०० आमदार निवडून आणू शकतो”
दरम्यान, मागच्या वेळी रमेश लटके यांना 60 हजारांपेक्षा अधिक मत पडली होती. तर अपक्ष म्हणून उभे असलेले मुरजी पटेल यांना 4500 हजार मत तर तिसऱ्या क्रमांकावर काॅंग्रेस होती. यावेळी भाजप आता मोठी रणनिती आखून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
Read also
- “नावात काय आहे ? शिवसेना हे नाव जरी गोठवलं तरी..;” संजय राऊतांचं स्पिरीट
- “कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव”; भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट, नागरिकांकडून संताप
- “शिंदे गटाने सुचवलेल्या तीन नावांत बाळासाहेबांचा उल्लेख”; आज फैसला होणार?
- राजकीय लढाई सुरूच..! उद्धव ठाकरेंची आता दिल्ली उच्च न्यायालयात धाव
- “कधी गाणे, कधी नकला, कधी शिवीगाळ..! विनोदी कलाकार आहेत की मंत्री?”