पुणे : आमच्या पक्षात परिवार म्हणजे देश आहे तर शिवसेनेत आमचा देश म्हणजे आमचा परिवार आहे. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसबरोबर जाण्याचा उद्धव ठाकरे यांचा चुकीचा मार्ग हा त्यांना खाईत घेऊन जाणार आहे. तसेच जेव्हा ते सोनिया गांधीसमोर अर्धे झुकले. तेव्हाच भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मला मनस्वी दुख झालं. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हॅक झाल्याने मी दुखी आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक व मत्सव्यवसायपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
“कधी गाणे, कधी नकला, कधी शिवीगाळ..! विनोदी कलाकार आहेत की मंत्री?”
पिंपरी चिंचवड लघू उद्योग संघटनेची आज बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. धनुष्य़बाण गोठविल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या विषयी सहानुभूती वाटते. शिवसेना मोठी केलेल्या तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असलेल्या कडवट शिवसैनिकांवर दोन्ही काॅंग्रेसचे विचार उद्धव ठाकरे यांनी लादण्याचा प्रयत्न केला. त्यांना जय सोनिया, जय शरद पवार म्हणायला लावले. तर ते कसे सहन करणार, म्हणून त्यांनी बंड केले. काॅंग्रेसबरोबर गेलो, तर मी माझे दुकान बंद करीन, असे बाळासाहेब म्हटले होते. आता शिवसेना ही काॅंग्रेसबरोबर गेल्याने बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकांनी तुमचे दुकान बंद केले असा घणाघात देखील त्यांनी ठाकरेंवर केला.
अब्दुल सत्तारांची सचिवाला शिवीगाळ..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज
बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंब फक्त उद्धव ठाकरेचं नाहीत, तर त्याचे चिरंजीव आणि आणि नातूही आहेत. तसेच बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. जे बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर उद्धव ठाकरे यांचे जे एकनिष्ठ आहेत. ते त्यांच्याचसोबत असल्याची खरमरीत टिका देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेकडून भाजपवर हल्लाबोल करण्यात येत आहे. या सर्व कटकारस्थानामागे भाजपचा हात असून एकनाथ शिंदे यांच्या कांद्यावर बंदूक ठेऊन शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. असा आरोप शिवसैनिकांकडून भाजपवर करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
Read also
- “उद्धवजी तुम्ही लढा..आम्ही आहोत तुमच्यासोबत”; काॅंग्रेसचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा
- “नावात काय आहे ? शिवसेना हे नाव जरी गोठवलं तरी..;” संजय राऊतांचं स्पिरीट
- “कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव”; भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट, नागरिकांकडून संताप
- “शिंदे गटाने सुचवलेल्या तीन नावांत बाळासाहेबांचा उल्लेख”; आज फैसला होणार?
- राजकीय लढाई सुरूच..! उद्धव ठाकरेंची आता दिल्ली उच्च न्यायालयात धाव