पुणे : राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणार उभे असून त्यासाठी आज मतदान झाले. त्याचा निकाल थोड्याच वेळात लागण्याची शक्यता आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा देखील आज वाढदिवस असून राज्यसभेतील सर्वच्या सर्व उमेदवार निवडून चंद्रकांत पाटलांना मोठं गिप्ट देऊ असं राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून म्हणण्यात येत आहे. तसेच रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना अनोखं गिप्ट पाठवलं आहे.
..म्हणून एमआयएमनं आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला; रोहित पवारांनी सांगितलं खरं कारण
राज्यात कुठेही निवडणुक लावा. मी जर निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. मात्र कोल्हापुर येथील पोटनिवडणुक चंद्रकांत पाटील लढले नाहीत. पण तिथे भाजपच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी वास्तविक पाहता हिमालयात जायला पाहिजे होते. मात्र ते काही गेले नाहीत. असं रूपाली पाटील म्हणाल्या.
मतदानावेळी मोठा घोळ; जितेंद्र आव्हाड, कांदे, यशोमती ठाकुर यांचं मत बाद ठरण्याची भाजपची मागणी
त्याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी चुलीत जा, मसणात जा, अशा पद्धतीचे विधान केले. त्यामुळे त्यांनी राजकीय संस्कृती संपविण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवशी हिमालयात जाण्यासाठी गोळा केलेला निधी आणि तेलाची बाटली, साबण, ब्रश, टुशपेस्ट कुरिअरने पाठवत आहोत, अंस रूपाली पाटील म्हणाल्या.
“हवेमध्ये उडणारे भाजपचे विमान संध्याकाळी जमिनीवर येईल”
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरात मोठी चुरस बघायला मिळणार आहे, कारण भाजपकडून अतिरिक्त उमेदवार म्हणून धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर भाजपकडून अनिल बोंडे, पियुष गोयल, तर शिवसेनेकडून संजय राऊतांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रफुल पटेल, आणि काॅंग्रेसकडून इम्रान प्रतापगढ़ी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा निकाल आज सायंकाळी लागणार आहे.
Read also:
- “लक्ष्मण जगताप यांनी दाखविलेली आश्वासक मुद्रा कधीच विसरू शकणार नाही”; देवेंद्र फडणवीस
- “नुुपुर शर्मा प्रकरणात मोदी, शहा, योगींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा” ;अमोल मिटकरी
- नुपुर शर्मा यांच्याविरोधात राज्यात, देशात मुस्लिम बांधव आक्रमक; अनेक ठिकाणी दगडफेक
- “ज्यांनी हनुमान चालिसाचा अपमान केला, त्याचा विनाश होणार”; रवी राणांचं मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टिकास्त्र
- “आजपासून भाजपची उलटी गिनती सुरू”; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल