मुंबई : टिल्ल्या लोकांनी हे मला सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. असल्या लोकांच्या नादी लागत नाही. असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नितेश राणे यांना टोला लगावला. त्यावर आता नितेश राणे यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“‘टिल्लू’ च्या वर्मावर घाव बसलाय”; राष्ट्रवादीचा नितेश राणेंना खोचक टोला
आम्ही सोडलेला बाण योग्य जाऊन लागलेला आहे. मुद्दा मला टिल्लू म्हणण्याचा मुद्दा नाही आहे. याच टिल्लूने तुम्हाला सिंधुदुर्ग बॅंकेच्या निमित्ताने कसा घाम फोडला. हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. असा टोला नितेश राणे यांनी अजित पवार यांना मारला आहे. तसेच धरणवीर म्हणजे कोण असं गुगलवर टाकलं तर अजित पवारचं येणार हे सिद्ध झाल्यानंतर तसेच खालच्या पातळीवर टिका केल्याने मनाचं समाधान होणार नाही. त्यामुळे त्यांनी वक्तव्य केलं आहे. असंही ते म्हणाले.
शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण? छगन भुजबळांचा सवाल
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य केलं आहे. टिल्लू च्या वर्मावर घाव बसलाय. तसेही त्याला, त्याच्या बोलण्याला व त्याच्या उंचीला कवडी कुणी किंमत देईना. अण्णाजीपंतांपुढे कुर्नीसात करणाऱ्या टिल्लूने जेवढी कुवत तेवढेत बोलावे, सोप्या भाषेत अवकात पाहून बोलावे. असा खोचक टोलाही त्यांनी नितेश राणे यांना लगावला आहे.
“महाराष्ट्राच्या इतिहासात पळवापळवीला थारा देणारे एवढे कमजोर नेते कधीचं झाले नसतील”
दरम्यान, नितेश राणे यांचा राष्ट्रवादीच्या पुणे शहाराच्या उपाध्यक्ष रूपाली पाटली यांनी देखील समाचार घेतला आहे. बेडकांनी, हो हो टिल्या बेडकांना धरणाचा आधार असतो म्हणा. पाणी असो की नसो. त्यामुळे लायकीत राहून बेडक्यांनी डराव डराव करावे. लायकी कामातून दाखवावी बरं का? असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
बेडकांनी,हो हो टिल्या बेडकांना धरणाचा आधार असतो म्हणा पाणी असो की नसो.
त्यामुळे लायकीत राहून बेडक्यांनी डराव डराव करावे.
लायकी कामातून दाखवावी बरं का?— Rupalipatilthombare (@Rupalispeak) January 5, 2023
Read also
- योगींच्या जाहिराती महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना देण्यामागचा भाजपचा छुपा अजेंडा काय?
- “राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी 1 हजार कोटी खर्च”, प्रियंका गांधी
- जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध, फडणवीसांना टॅग
- “कधीच कुणावर वैयक्तीक कंबरेखाली वार करत केला नाही, जर मला..” जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
- मुंबई फिल्मसिटी युपीला जाणार असल्याच्या आरोपावर योगीचं उत्तर, म्हणाले, मुंबई ही..