मुंबई : टिल्ल्या लोकांनी हे मला सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. असल्या लोकांच्या नादी लागत नाही. असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नितेश राणे यांना टोला लगावला. त्यावर आता नितेश राणे यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाकरेंची ताकद वाढतेय…! डोंबिवलीतील राष्ट्रवादीचे 11 पदाधिकांऱ्याचं शिवसेनेत प्रवेश
आम्ही सोडलेला बाण योग्य जाऊन लागलेला आहे. मुद्दा मला टिल्लू म्हणण्याचा मुद्दा नाही आहे. याच टिल्लूने तुम्हाला सिंधुदुर्ग बॅंकेच्या निमित्ताने कसा घाम फोडला. हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. असा टोला नितेश राणे यांनी अजित पवार यांना मारला आहे. तसेच धरणवीर म्हणजे कोण असं गुगलवर टाकलं तर अजित पवारचं येणार हे सिद्ध झाल्यानंतर तसेच खालच्या पातळीवर टिका केल्याने मनाचं समाधान होणार नाही. त्यामुळे त्यांनी वक्तव्य केलं आहे. असंही ते म्हणाले.
“योगी महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करतात, त्यावर राज ठाकरे गप्प का?”
त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य केलं आहे. टिल्लू च्या वर्मावर घाव बसलाय. तसेही त्याला, त्याच्या बोलण्याला व त्याच्या उंचीला कवडी कुणी किंमत देईना. अण्णाजीपंतांपुढे कुर्नीसात करणाऱ्या टिल्लूने जेवढी कुवत तेवढेत बोलावे, सोप्या भाषेत अवकात पाहून बोलावे. असा खोचक टोलाही त्यांनी नितेश राणे यांना लगावला आहे.
“टिल्लु” च्या वर्मावर घाव बसलाय. तसेही त्याला, त्याच्या बोलण्याला व त्याच्या उंचीला कवडी कुणी किंमत देईना. अण्णाजीपंतांपुढे कुर्नीसात करणाऱ्या “टिल्लुने” जेवळी कुवत तेवढेच बोलावे सोप्या भाषेत अवकात पाहून बोलावे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 5, 2023
Read also
- शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण? छगन भुजबळांचा सवाल
- “महाराष्ट्राच्या इतिहासात पळवापळवीला थारा देणारे एवढे कमजोर नेते कधीचं झाले नसतील”
- “आता शाहू, फुले, आंबेडकर ऐवजी जहांगीर, औरंगजेब, बाबर… म्हणणार बहुतेक NCP वाले”
- “सत्ताधारी पक्षांकडून गलिच्छ राजकारण, आता हे राजकारण थांबवावं,;” सुप्रिया सुळे
- “आता बावनकुळेंच्या जीं च्या फुली मारलेल्या फोटोला भाजप जोडो मारो आंदोलन करेल का ?”