मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते उत्तर प्रदेशात गुंतवणुक वाढवण्यासाठी उद्योगपतींची चर्चा करणार आहेत. परंतु मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मराठी तरूणांना रोजगार मिळावा म्हणून उत्तर प्रदेशमधील तरूणांना मारहाण केली होती. हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे जर राज्यात आघाडी सरकार असतं तर राज ठाकरे शांत बसले नसते. त्यामुळे आता शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत असताना राज ठाकरे गप्प का?असा सवाल रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडीचा खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केला आहे.
“गाडीचा चक्काचुर, डोक्यावर गमजा, अन् अंगावर शाल, धंनजय मुंडे मुंबईकडे रवाना?”
योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, व गोरखपुरचे खासदार रवि किशन देखील उपस्थित होते. राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट दिली.
मै झुकेगा नहीं साला..! फडणवीस, शहा, अन् केसरकारांना टॅग करून राऊतांचं आवाहन
आज मुंबईत योगी आदित्यनाथ रोड शो करणार आहे. मुंबईच नव्हे तर देशातील नऊ शहरांमध्ये त्यांचे रोड शो होणार असून त्यात राज्यातील गुंतवणूक संधीबाबत ते चर्चा करणार आहेत. यामध्ये ते टाटा समुह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, महिंद्रा, गोदरेज, आदित्य बिर्ला समुह, बाॅंबे डाईंग, ब्रिटानिया, जेएसडब्ल्यू समुह, एशियन पेंटस्, हिताची, हिरानंदानी, कोका-कोला, मारूती सुझुकी, अशोका लेलॅंड्स, ओस्वाल इंडस्ट्रीजसह अनेक कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि ज्येष्ठ उद्योगतींशी चर्चा करणार आहेत.
“माझ्या विधानावर ठाम, अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारा”; अजित पवार
दरम्यान, उत्तर प्रदेशात देखील महाराष्ट्र भवन व्हावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी म्हटलं होतं. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ यांच्यात झालेल्या भेटीत महाराष्ट्र भवन उत्तर प्रदेशात उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन उद्योगपतीची चर्चा करत आहे, आता #राजठाकरे गप्प का ?… सचिन खरात#MaharashtraPolitics@abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @zee24taasnews @News18lokmat @JaiMaharashtraN @SakalMediaNews @lokmat @LoksattaLive @Dainik_Prabhat @SaamanaOnline pic.twitter.com/bWUoxLAyol
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) January 5, 2023
Read also
- टिल्ल्या म्हणून डिवचल्यानंतर अजित पवारांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “मला देवाने..;”
- “तेव्हा मिर्झाराजे जयसिंगची भूमिका तीच आजच्या काळात औरंगजेबासोबत बावनकुळेंची”
- “इडीकडून अनिल परबांवर 10 कोटीची टाच, सगळ्यांना त्याची किमंत चुकवावी लागले”, अनिल परबांचा इशारा
- मोठी बातमी..! अनिल परबांवर इडीची मोठी कारवाई, तब्बल 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त
- “आव्हाडांचा मुंब्रारक्षक उल्लेख करत नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र”, म्हणाले…