मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे कधीच धर्मवीर नव्हते. असं वक्तव्य केल्यानंतर भाजपने अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रुर नव्हता. तसाच तो हिंदुद्वेष्टा नव्हता. असं व्यक्तव्य केलं होतं. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंजेबला औरंजेबजी असा उल्लेख करत नवा वाद निर्माण केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“माझ्या विधानावर ठाम, अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारा”; अजित पवार
क्रुरकर्मा औरंग्याला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी औरंगजेबजी असे सन्मानाने म्हणतात. त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिमंत दाखवतील का ? विशेषता टिलल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.
“फडणवीसांकडून जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत”; राज्यात आणखी एक नवा वाद
तसेच ज्याप्रमाणे औरंगजेबासोबत मिर्झाराजे जयसिंग होते तीच भूमिका आजच्या औरंगजेबासोबत बावनकुळे साहेबांची आहे. अशी शाब्दिक टिप्पणीही अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यामुळे हा वाद आता दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाही.
“तर दिपक केसरकरांनी 2024 मध्ये तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी”
संभाजी महाराज हे धर्मवीर कधीच नव्हते, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. त्यावरून भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचेच आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील औरंगजेब हा क्रुर आणि हिंदुद्वेष्टा नव्हता. असं वक्तव्य केलं. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी आव्हाडांना पत्र पाठवले आहे.
ज्याप्रमाणे औरंगजेबासोबत मिर्झाराजे जयसिंग होते तीच भूमिका आजच्या औरंगजेबासोबत बावनकुळे साहेबांची आहे #औरंगजेबजी
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 4, 2023
Read also
- “इडीकडून अनिल परबांवर 10 कोटीची टाच, सगळ्यांना त्याची किमंत चुकवावी लागले”, अनिल परबांचा इशारा
- मोठी बातमी..! अनिल परबांवर इडीची मोठी कारवाई, तब्बल 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त
- “आव्हाडांचा मुंब्रारक्षक उल्लेख करत नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र”, म्हणाले…
- “गाडीचा चक्काचुर, डोक्यावर गमजा, अन् अंगावर शाल, धंनजय मुंडे मुंबईकडे रवाना?”
- मै झुकेगा नहीं साला..! फडणवीस, शहा, अन् केसरकारांना टॅग करून राऊतांचं आवाहन